ज्ञान विकास इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी

49

 

 

ज्ञान विकास सामाजिक संस्था,(कोपरखैरणे , नवी मुंबई) इंग्रजी माध्यम शाळेमध्ये डोळ्याची मोफत चाचणीचे आयोजन आरजे शंकरा आय हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आले. तरी यामध्ये हॉस्पिटलच्या स्टाफने शाळेतील विद्यार्थ्यांचे डोळे चाचणी अत्यंत योग्य व चांगल्या प्रकारे करून त्यांना पुढील योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. अपर्णा पाटील व आरजे शंकरा आय हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आले होते.

मुलांच्या डोळ्याची काळजी घेण्यासाठी एक पाऊल ज्ञान विकास संस्था इंग्रजी माध्यमच्या माध्यमातून घेण्यात आले.

यावेळी कविता मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षिका देखील उपस्थित होत्या.