भारतीय मीडिया फाऊंडेशन च्या वतीने तुर्भे स्थापत्य विभागा विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

430

 

पत्रकार विजय साळव

२७ जानेवारी २०२५ रोजी भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीने तुर्भे विभाग स्थापन व पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर काही ठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे ठेकेदार यांनी तुर्भे विभागामध्ये योग्य काम केले त्यामुळे पाणी प्रश्न काही वेळा प्रयत्न सुरळीत झाला आहे, परंतु स्थापत्य विभागातील अधिकारी हे अजून जागे झाले नाहीत. त्यामुळे जे काम गरजेचे नाही ते अगोदर करण्यात येत आहे व ज्या कामाची गरज आहे त्यावर काम होत नाही अशी माहिती भारतीय मीडिया फाउंडेशन, डिप्टी चेअरमन, महाराष्ट्र राज्य किशोर लोंढे यांनी दिली. त्यामुळे येणाऱ्या २४ जानेवारी २०२५ रोजी नवी मुंबई महानगरपालिका तुर्भे विभागातील स्थापत्य विभागाच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

सोबत धर्मेंद्र ठाकुर, दिपक निगडे, दत्तात्रय दिवाने, किशोर राठोड व सुधिर ठाकुर.