नवी मुंबईतील समाजकार्यात सक्रिय असलेल्या जयश्री पाटील यांना राज्य शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे हा सन्मान देण्यात आला. महिला सबलीकरण, स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. २०२३-२४ या वर्षासाठी राज्यातील सहा महिलांमध्ये जयश्रीताई पाटील यांची निवड झाली आहे.जयश्रीताई पाटील यांना नवी मुंबई भूषण पुरस्कार तसेच वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप अवॉर्डने जयश्रीताई पाटील यांना गौरवण्यात आले आहे.
प्रख्यात विधिज्ञ ऍड. पी. सी. पाटील यांच्या पत्नी असून, त्यांनी घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेत तब्बल २१ वर्षे सेवा बजावली आहे. ज्ञान विकास संस्था, कोपरखैरणे येथिल शाळेमध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांना आई प्रमाणे प्रेम व शिकवण प्रत्येक वेळी देतात. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपली संस्कृती जपली पाहिजे असे ते आवर्जुन सांगतात. शिक्षण, समाजकार्य व प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. यावेळी राज्यातील विविध महसूल विभागांतून प्रत्येकी एका महिलेचा गौरव करण्यात आला. पुणे विभागातून संगीता किरण राणे, नाशिकमधून निवेदिता सुनील ताठे, छत्रपती संभाजीनगरमधून संगीता संजय बाविस्कर, अमरावतीतून नीलिमा वसंतराव काळे आणि नागपूर विभागातून नंदा कोल्हाटकर यांना सन्मानित केले.
यावेळी ऍड. पी सी पाटील, ऍड. पंकज पाटील, डॉ अपर्णा पाटील कोणीतरी मान्यवर उपस्थित होते.





