तुर्भे स्टोअर्स, नवी मुंबई येथे भीमजयंती 134 वी जयंती निमित्त बैठक संपन्न

21

 

दिनांक ०८ मार्च 2026 रोजी तुर्भे स्टोअर्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष्याचे कार्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त बैठक पार पडली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिध्दाराम ओहोळ साहेब. जेष्ठ नेते शिवाजी शिंदे साहेब. जेष्ठ नेते नागेश कांबळे साहेब नवी मुंबई. जेष्ठ नेते आंनदबोधी निकाळजे यांच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सर्वच पक्षातील पदाधिकार्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. या संदर्भात अंतिम बैठक दि. 11/03/2026 रोजी सायंकाळी 5.30 पुन्हा आयोजित केली आहे. तरी सर्व भीमसैनिक, सर्व आंबेडकरी पक्ष, संघटना यांनी बैठकीस उपस्थित राहून नवा पायंडा, आदर्श निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन जेष्ठ नेत्यांनी केले.

पत्रकार किशोर लोंढे यांनी पक्ष व गट तट न करता सर्वांनी मिळून मिसळून समाज्यासोबत आले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.

युवा नेते ऍड यशपाल ओहोळ यांनी जयंतीला वेगळेपण कसे देता येईल याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.

गौतम रागी यांनी देखील यावर मंडळाची बैठकीत चर्चा करण्यात येईल असे आश्वासन दिले.

ज्ञानदीप निकाळजे यांनी जयंती समीती मध्ये सर्वांना सन्मान व पद दिली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.

परेश माने चळवळीत कार्यक्रम घेतले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.

बिभीषण डोळस जुन्या चळवळ पुन्हा जिवंत करण्याचें काम केले जेष्ठ नेत्यांनी केले आहे असे मनोगत व्यक्त केले.

संजय कांबळे मिरवणुक एकत्र निघणे व गर्दी करणे हा हेतू न ठेवता. समाज्यासाठी उपयुक्त असे कार्यक्रम घेतले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.

बाबु रागी आम्हाला यांच्या अगोदर विश्वासात घेतलं नाही त्यामुळे यापुढे असे प्रकार नाही झाले पाहिजे व आम्ही देखील आपल्या सोबत आहोत असे मनोगत व्यक्त केले.

अभिमान जगताप आपला समाज एकत्र येत असेल तर फार छान व अभिमानास्पद गोष्ट आहे असे मनोगत व्यक्त केले.

राजु शिंदे यांनी देखील मी कोणतेही काम करण्यास तयार आहे असे मनोगत व्यक्त केले.

राजेंद्र इंगळे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात यावी असे मनोगत व्यक्त केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिध्दाराम ओहोळ साहेब तुर्भे स्टोअर्स येथे १ जयंती १ मिरवणूक हा विषय घेऊन आपण पुढे जाऊ व सर्वाचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले.

शिवाजी शिंदे यांनी देखील उपस्थित सर्वांचे अभिनंदन व आभार मानले तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.